यावल तालुक्यातील आदीवासींच्या विकास योजनांचा बट्टयाबोळ कुपोषणग्रस्त आठ महीन्याचा बालक दगावल्याने वास्तव आलेसमोर

0
14

प्रविण मेघे

यावल-तालुक्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरण परीसतील आकाश जवानसींग पावरा या आठ वर्षीय आदिवासी बालकाचा कुपोषणामुळे झालेल्या मुत्यु प्रकरणी येथील तालुका वैधकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गौरव भोईटे , डॉक्टर राहुल गजरे यांनी भेटी देऊन पीडित कुटुंबाची चौकशी केली केल्याचे वृत्त असुन , याबाबत त्या आदीवासी वस्तीतील नागरीकांच्या वतीने मात्र अशा कुठल्याही प्रकारची चौकशी व माहीती घेण्यासाठी कुणी आले नसल्याचे सांगण्यात आलेत, फक्त काही महीला आल्या व त्यांनी चौकशी करून गेल्याचे वृत्त आहे . मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने चौकशीअंती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे डॉक्टर बऱ्हाटे यांनी सांगितले आहे .

कुपोषणामुळे बालकाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला असून तालुक्यात कुपोषणग्रस्तांचा पुर्नर्सव्हेक्षण झाल्यास अनेक धक्कादायक प्रकारसमोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . दरम्यान सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वड्री धरण परिसरात काही सामाजिक संस्थांनी जाऊन आदिवासी कुटुंबियांना मदतीचा हात समोर केला आहे . दरम्यान कुपोषणामुळे आठ महीन्याचा बालक मरण पावलेल्या घटनेमुळे संपुर्ण जळगाव जिल्ह्यातील सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन , आदीवासी एकात्मिक प्रकल्प विभाग , जिल्हा परिषदचे महीला व बालविकास विभाग कार्यालय व आरोग्य यंत्रणा ही तालुक्यातील आदीवासी बांधवांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोटयावधी रुपयांच्या योजनांचा पुर्णपणे बट्टयाबोळ झाला असुन , या कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्युच्या विषयाची पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली असुन , दरम्यान वरिष्ठ पातळीवर या संदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात येत असल्याची माहीती प्राप्त झाली असुन , स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातुन आदीवासींच्या वास्तव्या बाबत चुकीची व दिशाभुल करणारी वरिष्ठांना पाठवुन आपला कसा या गंभीर प्रकरणातुन सुरक्षीत बचाव होइल याच प्रयत्नात तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणा लागली असल्याचे दिसुन येत आहे . या संदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी या विषयाला गांर्भीयाने घेणे अत्यंत गरजेचे आहे .

Spread the love