यावल तालुक्यातील एका औषध पेढीचा परवाना निलंबित.

0
11

माहिती अधिकाराचा आणि तक्रारीचा दणका.

यावल – तालुक्यातील एका औषधपेढीचा परवाना महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी यांनी निलंबित केल्याचा लेखी आदेश प्राप्त झाला आहे,यामुळे माहिती मिळाल्यानंतर तसेच तक्रारीची दखल घेतली गेल्याने शासकीय कार्यालयात सामाजिक, कामकाजासह,गैरप्रकार,भ्रष्टाचार व दलाली करणाऱ्यांमध्ये यावल शहरासह तालुक्यात माहिती अधिकार कायद्याचा मोठा धाक निर्माण झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तालुक्यातील एका मेडीकल दुकानदाराने एक्सपायर डेट झालेले (कोणाला किंवा दलालास वस्तुस्थिती आणि दुकानदाराचे नाव,गाव,पत्ता जाणून घ्यायचा असल्यास त्यांनी तक्रारदाराकडे संपर्क साधल्यास कायदा,सामाजिक कर्तव्य, स्वाभिमान काय असतो हे त्याला समजून येईल)टॉनिक विक्री केले होते,त्याचे बिला सह सबळ पुरावा तक्रारदाराकडे होता,(सबळ पुराव्यासह तक्रारदार तक्रार करू शकत नाही).हे लक्षात घ्यावे. तसेच परवानाधारक मेडिकल दुकानदार अनेक वेळेला दुकानात उपस्थित राहात नाही.अशा या प्रकरणात मध्यस्थी दलाली न करता रितसर संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती,तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांनी दि.10/2/2022 चा आदेश दि.4/3/2022 रोजी र.पो.केले ते तक्रारदारास दि.7मार्च2022रोजी र.पो.प्राप्त झाले आहे.त्या आदेशात सहाय्यक आयुक्त यांनी नमूद केले आहे की त्या मेडिकल दुकानदाराचा तपास व चौकशी करून मेडिकल पेढीचा परवाना 15 दिवस निलंबित केला आहे असे म्हटले आहे,याबाबत तालुक्यातील एका दलालास हे एक मोठे आव्हान आणि कायद्याचा दणका असून ते मेडिकल दुकान 15 दिवस बंद होते का?याबाबत सुद्धा पुरावा असल्याने त्या दलालाने खात्री करून लोकांची व व्यापाऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करण्याचे उद्योग थांबवावे नाही तर या पुढील कायदेशीर मोठा दणका लवकरच बसेल असे यावल शहरासह तालुक्यात बोलले जात आहे.

अशाच प्रकारे यावल तालुक्यात महसूल मधील एका जबाबदार जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने बेकायदेशीर मुख्‍तयार पत्र तयार करून दिले आहे याची चौकशी अँटी करप्शन विभागामार्फत तसेच संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याने त्याचा कायदेशीर दणका लवकरच जनतेसमोर येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Spread the love