दिपक नेवे
“भिम आर्मी” राज्य प्रवक्ता मा.रमाकांत जी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव मा.सुपडू भाऊ संदानशिव यांच्या साथीने तसेच जळगांव जिल्हा प्रमुख मा.गणेश भाऊ सपकाळे यांच्या सूचनेनुसार आज दि.१७ ऑगस्ट रोजी यावल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी त्यात प्रांताधिकारी साहेब फैजपूर,गटविकास अधिकारी यावल,सार्वजनिक बांधकाम विभाग यावल व यावल पोलीस स्टेशन येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यावल तालूका प्रमुख मा.हेमराज भाऊ तायडे यांच्या नेतृत्वात यावल तालुक्यातील चुंचाळे फाटा ते चुंचाळे गाव या दरम्यानच्या रस्ते दुरुस्तुची मागणी असलेले निवेदन देण्यात आले….सदर रस्त्यावर कायम वाहनांची वर्दळ असते परंतु रस्ता निकृष्ट असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते…..यामुळे छोटे-मोठे अपघात नेहमीच होत असतात व सद्ध्या पावसाळी दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्यांमध्ये पाणी देखील भरलेले असते… ज्यामुळे नक्कीच मोठा अपघात घडू शकतो,,, शासन दरबारी नेहमी पाठपुरावा केलाय परंतु दखल घेतली जात नाही.कदाचित या झोपलेल्या प्रशासनाला मोठा अपघात घडल्यावर जाग येईल कि काय असा प्रश्न “भिम आर्मी” राज्य प्रवक्ता मा. रमाकांत जी तायडे यांनी व्यक्त केला..
तसेच येत्या १ सप्टेंबर पर्यंत शासन स्तरावर योग्य कार्यवाही न झाल्यास १ सप्टेंबर रोजी “भिम आर्मी” जळगांव जिल्हा युनिट व यावल तालुका युनिट यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा निर्वाणीचा इशारा “भिम आर्मी” राज्य सचिव मा.सुपडू भाऊ संदानशिवयांनी दिला..सदर निवेदन देते समयी,”भिम आर्मी” राज्य प्रवक्ते रमाकांत जी तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे, शहर प्रमुख हर्षल गजरे,यावल तालुका उपाध्यक्ष आकाश बिऱ्हाडे, यावल तालुका कार्याध्यक्ष निलेश सपकाळे, बोराळे शाखा सचिव करण ठाकरे,पंकज डांबरे,महेंद्र तायडे,अनुराग तायडे, करण अडकमोल,आकाश गजरे,गणेश गजरे आदी उपस्थित होत.