यावल येथे अवैध दारू वाहतूक करणारे वाहन पकडले,अडीच लाखांचा मुद्देमाल सह दिघांना अटक

0
14

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल : शिरपूर येथून मध्य प्रदेश कडे अवैधरित्या देशी दारू घेवून जाणाऱ्या एका वाहनावर यावल पोलिसांनी कारवाई केली.

सोमवारी रात्री शिरपूर कडून मध्य प्रदेश अवैधरित्या देशी दारू एका वाहनाद्वारे वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांना मिळाली होती .

तेव्हा त्यानी पोलीस स्थानकात तातडीने सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान , सहाय्यक फौजदार अस्लम खान , हवलदार बालक बाऱ्हे , सुशिल घुगे , राहुल चौधरी ,निलेश वाघ , यांना बोलावून सायकाळी बुरुज चौकात वाहन तपासनी करण्यात आली.

तेव्हा त्याच वेळी शिरपूर कडून येणाऱ्या एम एच ०१ बि.डी. ९१२४ या कारच्चा डिक्कित अवैधरित्या देशी दारू वाहतूक करतांना आढळून आली .

वाहनात टाँगो पंच या देशी दारूच्चा ४८ बाटल्या मिळून आल्या व वाहनातील अतुल अरुण मानकर , शुभम नरेद्र मावळे , रा. पिंपळगाव ता. जळगाव जामोद व निलेश सुभाष बेलदार रा. दापोरा ता. जि. बऱ्हाणपूर म.प्रदेश या दिघांना ताब्यात घेतले देशी दारू किंमत २ हजार ८८o व वाहन अडीच लाख असा एकूण दोन लाख ५२ हजार ८८० किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे .

या विरुद्ध यावल स्थानकात तिघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार अस्लम खान हे करीत आहे .

Spread the love