यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल – : या संदर्भातील माहितीनुसार शहरातील काजीपुरा परिसरातील आज सायकाळी नाजिया जलिल काझी ( वय ३५ ) रा. काझिपूरा या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यात हि महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ येथे धाव घेवून पंचनाम्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल येथील ग्रामिण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासनी करून महिलेस मृत घोषित केले आहे
संशयित आरोपी कुराड घेऊन पोलीस स्थानकात हजर.
या प्रकरणामागे नाजिया खलिल काजी यांच्या हत्या प्रकरणामागे अनैतिक संबंधानाची प्रकार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकणी जावेद युनूस पटेल (वय २८ रा. यावल) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. काहि माहन्यापुर्वी जावेद पटेल यांच्चावर प्राणघात हल्ला करण्यात आले होते . यातून तो बचावला होता. त्याला या हल्ल्यात बऱ्याच जखमा झाल्या होत्या. यातील हल्लेखोर हे मयत महिलेचे निकट असल्याचे समजते. यानंतर जावेद पटेल याने आज दबा धरून नाजिया काझी यांचेवर कुऱ्हाडीने वार केल्यामुळे तिचा जागिच मुत्यू झाला तसेच संशयित थेट कुऱ्हाड हातात घेवून पोलिस स्थानकात जावून आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.
या प्रकरणी शहरात एकच खळबळ उडाली आहे.