यावल येथे मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानचे संपुर्ण महीन्यांच्या रोजदारांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन

0
10

यावल – आदीवासी समाजातील सामाजीक कार्यकर्ते तथा ग्रामसेवक रुबाब महमंद तडवी यांच्या वतीने मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महीन्यांचे संपुर्ण रोजे ( उपवास ) ठेवणाऱ्या रोजदारांसाठी रोजा ईफ्तार पाटीचे आयोजन करण्यात आले होते . यावल येथील विरार नगर मधील तडवी कॉलनीतील हजरत बिलाल मस्जिद मध्ये पवित्र रमजान महीन्यांचे रोजे ( उपवास ) ठेवणाऱ्या समाज बांधवांसाठी आदीवासी चळवळीतील समाजसेवक तथा ग्रामसेवक रूबाब तडवी यांच्या वतीने रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी रूबाब तडवी यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन महीन्यांच्या रोजदारांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या रोजा ईफ्तार पार्टीत अन्नदानाची सेवा केली . यावेळी त्यांना जावेद तडवी , रौनक तडवी व आदी त्यांच्या आदीवासी तरूण मित्रमंडळीनी त्यांना या ईफ्तार कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले या प्रसंगी हजरत बिलाल मस्जिदचे विश्वस्त ही उपस्थित होते. या रोजा ईफ्तार पार्टीला पवित्र रमजानचे संपुर्ण रोजे ( उपवास ) ठेवणारे रोजदार हे मोठया संख्येत या ईफ्तार पार्टी च्या कार्यक्रमास उपस्थित होते .

Spread the love