दिपक नेवे
यावल ( प्रतिनिधी ) येथील तत्कालीन चेअरमनच्या आर्थिक व भ्रष्ठ अशा व्यवहाराच्या गोंधळलेल्या कारभारामुळे दिवाळखोरीला निघालेल्या श्रीकालींका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत यावल चे कामकाज हे अवसायनात घेणे आली याकरीता काही संचालक मंडळाने सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर त्यांच्या परिश्रमाला यश आले आहे . दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की येथील श्री कालींका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत यावल या पत संस्थेची दिनांक १ / ०४ / २०१५ते ३१ / o३ / २०१७ अखेरचा प्रशासकीय नुसार कर्जदार यांचे व्यवहार उशिराने नोंदविणे तसेच वार्षीक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ सभा इत्तीवृत्ता बाबत संस्थेच्या नियमितपणे सभा झाल्या किंवा नाही तसेच संस्थेने कलम १०१कामी वकील फी पोटी बरीच रक्कम खर्च केली असुन त्याबाबत ताळेबंद मध्ये देणे दर्शवल्या नाही व संस्थेने थकीत कर्जदार यांच्या जंगम मालमत्तेचा लिलाव केला असुन कर्जदाराच्या घरातील जप्त केलेल्या वस्तु कर्जदारास परत केल्या किंवा काय याची खात्री करता येत नाही तसेच संस्थेने बेकायदेशीररित्या रोखीने रकमा परत केल्या आहेत वगैरे या बाबत सहकारी संस्थांचे यावलचे उपलेखा परिक्षक डी व्ही ठाकुर यांनी ०१ / ०३ / २०१७या कालावधीचा प्रशासकीय अहवाल सादर केला असुन , सदर प्रशासकीय अहवालाच्या अनुषंगाने कलम ८८नुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणुन नेमणुक झालेली आहे . या संदर्भात संस्थेचे विद्दमान चेअरमन पंकज सोनार यांच्याकडुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल या ठिकाणी दिनांक १९ / ०३ / २०२१ रोजी चौकशी केली असता संस्थेची आवश्यक रेकॉर्डचे मागणी त्यानुसार माहीती घेतली असता चेअरमन पंकज सोनार यांचे कडून पदभार काढुन घेतला असुन महाराष्ट्र सहकारी संस्था नियम१९६१ त्यामधील नियम७२ ( १ ) नुसार दिनांक ७ / ०१ / २०२०पासुन संस्थेचे अवसायक म्हणुन डी एफ तडवी यांची नियुक्ती झाली असुन व प्रस्तुत मुद्दा बाबत संस्थेस लाखो रुपयांचे आर्थिक नुकसानीची जबाबदारी तत्कालीन जाब देणार संस्थेचे चेअरमन व संचालक यांचेवर का निश्चित करू नये ?यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम१९६०चे कलम ८८मधील तरदुतीनुसार चौकशी करून संस्थेस झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी निश्चिती कामी, जाब देणार संचालक जबाबदार आहेत का ?वते किती रकमेच्या गैरव्यवहारास जबाबदार आहेत याची निश्चिती करणे कामी प्राधीकृत चौकशी अधिकारी म्हणुन सक्षम अधिकारी यांची नेमणुक झाली असुन , या श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत मधील लाखो रुपयांचा झालेल्या गैरव्यहाराचा सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या अपहाराची निष्पक्ष : चौकशी होवुन संचालक ठेवीदारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा संचालक नितिन सोनार , संचालक देवराम कृष्णा राणे , टालु महाजन, सैय्यद अखलाक अली यांनी व्यक्त केली आहे .