यावल प्रतिनिधि अमीर पटेल
यावल : शहरातील ३३ वर्षीय विवाहित आपल्या सहा वर्षीय मुलीच्या सह बेपत्ता झाली आहे. महिला मुलीसह सोमवारी जळगाव जाण्यासाठी यावल हुन निघाली होती. मात्र ती तिकडे पोहोचली नाही व सर्वत्र शोध घेऊन मिळून न आल्यामुळे यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरावरील पुजारी त्रिभुवनदास लक्ष्मण बैरागी यांच्या पत्नी ज्योती त्रिभुवनदास बैरागी व विवाहितीची मुलगी त्रिशिका पवार वय ६ वर्ष हे दोघं सोमवारी यावल येथुन जळगाव जाण्यासाठी दुपारी साडेबारा वाजेला बस स्थानक वर आल्या होत्या मात्र, सायंकाळ झाली तरी त्या जळगाव येथे नातेवाईकांकडे पोहचल्या नाही तेव्हा दोघांचा सर्वत्र शोध घेऊन देखील त्या कुठेच मिळून आल्या नाही तेव्हा बुधवारी यावल पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तर या प्रकरणी एसटी वाहकांकडे चौकशी केली असता बेपत्ता झालेली विवाहिता शेगाव जाण्यासाठी कसे जावे लागते या संदर्भात माहिती विचारत असल्याचे वाहकाने सांगितले. पुढील तपास सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.