यावल,रावेर तालुक्यात सिंचन विभागात अत्यंत निकृष्ट प्रतीची बांधकामे. कार्यकारी अभियंता यांचे दुर्लक्ष.

0
50

प्रवीण मेघे
यावल रावेर -तालुक्यात सिंचन विभागामार्फत वनक्षेत्रात,शेती शिवारात नदी नाल्यांवर बांधले जाणारे नालाबांध हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे बांधकामे होत असल्याने या भोंगळ कारभाराकडे जिल्हा परिषद सिंचन विभाग कार्यकारी अभियंता,उपकार्यकारी अभियंता, आणि यावल-रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, बांधकाम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावल-रावेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये ठेकेदार आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत
यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेती शिवारातील सिंचन विभाग जि.प.जळगाव अंतर्गत बंधाऱ्याच्या कामाची प्रत किती खराब,निकृष्ट प्रतीचे आहे यात रेती खडीचे काम न होता रेती माती मधे काम काम केलेले असून हे शेतकरी वर्गाने थोडे कोरूण बघितले तर त्यामध्ये रेती खडी न वापरता रेती माती सिमेंट वापरून केलेले आहे शेतकर्‍यांनी कुंडाचे काम कोरूण बघितले तर माती दगड दाबून काम केले आहे व त्यावर सिमेंटच्या पाणी करूण टाकून दिले आहे शेतकरी वर्ग कार्यवाहीची मागणी करीत आहे परंतु आज पर्यंत कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी एका बंधाऱ्यांची सुद्धा चौकशी केली नाही निकृष्ट कामाचे अजून एक शायाचित्र समोर आले आहे समंधित अधिकारी करत असल्याचे दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदारास बिल अदा करू नये असे आव्हान शेतकरी करीत आहे की आपण या बंधाऱ्याना खोदा त्या मध्ये काय मटेरियल निघते ते बघा आणि तुमच्या istimet नुसार बांधकाम झाली आहे का असल्याने आपण सर्व उघड्या डोळ्यांनी बघायचं का? पाणी अडवा पाणी जिरवा या कार्यक्रमांतर्गत शासन एव्हढा मोठा खर्च करते परंतु अधिकारी वर्ग या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे असे शेतकर्‍यांचे म्हणने आहे

Spread the love