गोंभी – वांजोळा रस्त्यावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तू तू मैं मैं ?

0
6

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – येथून जवळच असलेल्या गोंभी – वांजोळा रस्त्यावर रस्ता निकृष्ट होण्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये तू तू मैं मैं झाल्याची चर्चा सुरु असून काही वेळ पदाधिकाऱ्यांनी व गोंभी ग्रामस्थांनी काम बंद केल्याची घटना घडली मात्र अधिकारी व ठेकेदार यांनी रस्ता चांगल्या प्रकारे होणार असल्याची खात्री दिल्याने या वादावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

या बाबत माहिती अशी की , दि.२२ डिसेंबर रोजी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांना गोंभी गावातून फोन आला की गोंभी – वांजोळा दरम्यान रस्त्याचे काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे सुरु आहे त्यामुळे उपसरपंच एकनाथ सपकाळे व ग्रामपंचायत सदस्य पती युवराज पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व कामाच्या इस्टिमेट ची मागणी केली तसेच जो पर्यंत इस्टिमेट दाखवत नाही तो पर्यंत काम बंद करण्यात यावे असे सांगीतले मात्र ठेकेदाराने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तसेच काम इस्टिमेट प्रमाणेच सुरू आहे असे सांगीतले यावेळी ठेकेदार व सदस्य पती युवराज पाटील यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि या ठिकाणी सरपंच पती भोजराज कोळी व उपसरपंच एकनाथ सपकाळे दोन्ही उपस्थित असताना या दोघांनी युवराज पाटील यांची बाजू घेतली नाही असे युवराज पाटील यांनी जळगाव संदेश शी बोलताना सांगीतले आहे.

दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी पुन्हा या रस्त्याचे काम सुरू केले असता उपसरपंच एकनाथ सपकाळे , सदस्यपती युवराज पाटील , सदस्य रंजना पाटील , गोंभी ग्रामस्थ व सरपंच पती भोजराज कोळी हे घटनास्थळी दाखल झाले व पुन्हा रस्त्याचे काम सुरू करण्यापुर्वी जेसीबी मशिनने रस्ता खोदावा तसेच टँकरने रस्ता धुवून नंतर काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी केली. या दरम्यान सरपंच पती भोजराज कोळी ,महिला सदस्य वैशाली पाटील यांचे पती युवराज पाटील व उपसरपंच एकनाथ सपकाळे यांच्यात चांगलीच ‘ तू तू मैं मैं ‘ झाली.

हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी संबंधीत असल्याने अभियंता प्रदिप दोडे यांनी ठेकेदाराला सुचना केल्याचे समजते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्त्यावर काँक्रीटीकरण करण्या अगोदर टँकरने पाणी टाकून स्वच्छ करण्यात येईल व नंतर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे असे प्रदिप दोडे जि.प.बांधकाम अभियंता भुसावळ यांनी सांगीतले तसेच रस्त्याचे काम सुरु आहे वाहने सावकाश चालवा किंवा काम चालू रस्ता बंद किंवा अन्य प्रकारचा कोणताही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाही तसेच रात्रीच्या वेळी या ठिकाणी लाल रंगाचे लाईट लावणे आवश्यक आहे.

Spread the love