मुंबई -:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.
याअनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले असून, संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. तसेच ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलून ९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. मतमोजणीनंतर निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आदर्श आचारसंहिता समाप्त होणार आहे.










