दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

0
51

भडगाव – संतोष शिवराम पाटील (वय ३८, रा. चोपडा) यांचा चाळीसगावहून कजगावकडे येत असतांना दुचाकी दुभाजकावर आदळून सं मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

चोपडा येथील संतोष पाटील हे दुचाकीने चाळीसगाव येथून कजगावडे येत असताना हिंगोणे गावाजवळ त्यांची दुचाकी ही दुभाजकावर आदळली. या अपघातात संतोष पाटील यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. संतोष पाटील हे बारामती साखर कारखान्यात कर्मचारी असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Spread the love