श्रावण मासा निमित्त गोंभी येथे मरीमाते पूजन !

0
4

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोंभी येथे सालाबादप्रमाणे यंदाही पोलीस पाटील वैशाली पाटील यांच्या माध्यमातून श्री मरीमाता चे पूजन करण्यात आले.पूजन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी भगत विजय कोळी ,रतीलाल कोळी , योगेश पाटील , पुंजो पाटील , ज्ञानेश्वर पाटील , दिलीप कोळी , सचिन पाटील , उमेश पाटील , पिंटू कोळी , युवराज पाटील तसेच uj गावातील बालगोपाल मंडळी हजर होते. ग्रामीण भागातील परंपरेनुसार श्रावण महिन्यातील मंगळवारी श्री मरीमाता पूजन केल्याने गावात रोगराई येत नाही अशी श्रद्धा असल्याने गावातील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून ही पूजा केली जाते.अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा अखंडपणे आजही प्रत्येक गावात सुरू आहे. विशेष म्हणजे गोंभी गावात संपूर्ण गावा मिळून उडीदडाळ व भाकरी तयार करून भंडारा करण्याची एक परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून त्या निमित्ताने संपूर्ण गावाची एकजूट पाहायला मिळते.

Spread the love