नगरसेवक किशोर बाविस्कर यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये लावला विकास कामांचा सपाटा ii गवळी व कुंभार समाज परिसरात नवीन गटारीचे भूमिपूजन संपन्न.

0
44

जळगाव -:नगरसेवक किशोर बाविस्कर व त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ उज्वला बाविस्कर यांनी आपल्या प्रभागामध्ये विकास कामांचा एक प्रकारे सपाटा लावलेला दिसत आहे.प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी त्यांचे घरी जाऊन समस्या जाणून घेऊन समस्यांचे निवारण करण्याचा जणू एक प्रकारे नगरसेवक किशोर बाविस्कर व नगरसेविका उज्वला बाविस्कर यांनी वेळात उचललेला आहे.या अगोदर देखील या परिसरात डांबरी रस्ते असतील.पथदिवे,जुने इलेक्ट्रिक पोल खराब झाल्याने नवीन पोल,ठिकठिकाणी काँक्रिटीकरण,गटार, पाण्याची पाईपलाईन अशा अनेक प्रकारचे काम नगरसेवक बाविस्कर दाम्पत्याने केलेली आहेत.

त्याचप्रमाणे आज दि,१५/०३/२३, रोजी येथील प्रभाग क्रं,(२) मधील कुंभार समाज व गवळी समाज परिसरातील भागात नवीन गटारी चे भूमिपूजन येथील ज्येष्ठ नागरिक सुकलाल हिवरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेवक श्री,किशोर रमेश बाविस्कर,नगरसेविका सौ,उज्वला किशोर बाविस्कर,
बंटी भाई , विनोद भाऊ , बंडू सोनार, गणपत कुंभार, राजू कुंभार, उमेश सोनवणे, दिलीप हिवरकर, विनोद गायकवाड, सुभाष कुंभार, प्रजापती ताई, ठेकेदार अक्षय राणे, इत्यादी उपस्थित होते,
या प्रभाग क्रं 2, चा उपभाग हा कुंभार समाज मंगल कार्यालयाचां आहे, या परिसरात डांबरीकरण रस्ता ,व पथदिवे, नवीन पोल, काँक्रीट रस्ता, गटार,व , पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, भुयारी गटारी संपूर्ण शासकीय योजना नागरीकांन पर्यन्त पोहचवल्यात त्यामुळे परिसरातील नागरिकांन कडून नगरसेवक, किशोर बाविस्कर व, नगरसेविका,उज्वला बाविस्कर या दाम्पत्याचे कौतुक करण्यात आले,

Spread the love