जळगाव(प्रतिनिधी)सिद्धिविनायक गणपती मंदिर रेल्वे कॉलनी येथे श्री सोमेश्वर शिवमंदिराची स्थापना करण्यात आली.श्री सोमेश्वर शिवमंदिराची आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. 12 मार्च रोजी सकाळी 7 वाजता प्राणप्रतिष्ठा मुर्ती मिरवणूक काढण्यात आली. तर 13 रोजी मुर्ती श्री सोमेश्वर शिवलींग मुर्तीचा अभिषेक सकाळी 9 वाजता करण्यात आला.सकाळी 10 वाजता श्री सोमेश्वर शिवलींग मुर्तीची स्थापना चेतन कपोले गुरुजी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून केली. दुपारी 12 वाजता मनोज काळे व माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी 9 जोडप्यांनी हवन पुजा केली.श्री सोमेश्वर महादेव मंदिर दिव्य आणि भव्य असा बनविण्यात आलेला असून मंदिरात 25 ते 30 लोकांचे बैठक व्यवस्था आहे. तसेच आठ ते दहा जण पूजेसाठी बसू शकतात इतकी मोठे ओट्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळी रेल्वे कॉलनीचे सदस्य चंद्रकांत चौधरी, रुपेश माळी, पवन जैन, राकेश झवर, विलास कोलते, महेश वाणी, भरत पांडे, वकील सुनील तारे, आयुष झवर, मोहित बावस्कर, रुपेश झवर, अविनाश बोरोले, राहुल पाटील, सारंग झवर, गोविंद पाराशर, संजय देव, धनंजय राव ,सुनील चौधरी, सोनू जगताप, शैलेंद्र बेंडाळे, सतीश सोमाणी, सोनल जैन, सुनीता गांगुर्डे, सुनिता सातपुते, विद्या चौधरी, स्वाती झवर, वाणी मावशी, लता झवर, पूजा माळी, स्वाती वाणी, राखी झवर, विजया देव, उर्मिला खडके, राजश्री बोरवले, प्रमिला कोलते, रूपाली काबरा, कमल बोरवले, तसेच रेल्वे कॉलनी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.











