हेमकांत गायकवाड
चोपडा : श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर,( श्रीराम नगर) चोपडा, जिल्हा – जलगांव, महाराष्ट्र येथे आज 2/ 9/ 20 21 रोजी चोपडा येथे , , एसटी कर्मचारी संघटनेचे नेते श्री अनंत मोतीलाल चौधरी व त्यांच्या धर्मपत्नी सौ भावनाताई अनंत चौधरी यांचा कोरोणा योद्धा म्हणून चोपडा तेली समाजातर्फे सत्कार करण्यात आला .कोरोना काळात एसटी महामंडळात जिवाची पर्वा न करता सेवा दिली. एस टी महामंडळ चोपडा येथे चोपडा बडोदा तसेच अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे .त्यांच्या कार्याचा गौरव संस्थेचे सह सचिव श्री प्रशांत सुभाष चौधरी तसेच विश्वस्त ह भ प गोपीचंद रघुनाथ चौधरी यांनी केला .त्यांच्या या गौरवा प्रित्यर्थ संस्थेचे अध्यक्ष श्री के. डी. चौधरी , उपाध्यक्ष श्री टी. एम. चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले .यावेळी त्यांचे शुभ हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ह भ प गोपीचंद महाराज , संस्थेचे सह सचिव श्री प्रशांत सुभाष चौधरी त्यांच्या धर्मपत्नी सौ नम्रता प्रशांत चौधरी, निशांत चौधरी, श्रीकांत चौधरी ,प्रकाश श्रावण चौधरी ,विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी, ह भ प तेजस, ह भ प लक्ष्मण महाराज , ह भ प ज्ञानेश्वर आप्पा नेरकर, विश्वस्त श्री देवकांत के. चौधरी ,मदन मिस्तरी, भाईदास पाटील ,गौरव पाटील जगदीश मिस्त्री, बालगोपाळ मंडळी उपस्थित होते.












