जळगाव -जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यापैकी पात्र १५ शिक्षकांची यादी शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांनी जाहीर केली आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील दिनेश मोरे मारवड ता. अमळनेर, मनिषा पाटील वढवेनवे ता. भडगाव, नामदेव महाजन मोंढाळे रा. पुरस्कार, योगेश घाटे नाडगाव ता. बोदवड, ओमप्रकाश थेटे पिंपळगाव प्र.दे.ता.चाळीसगाव, सोमनाथ देवराज वेले आखातवाडे ता. चोपडा, माधुरी देसले दोनगाव खुर्द ता. धरणगाव, पद्माकर पाटील टाकरखेडा ता. एरंडोल, मोनिका चौधरी वडली ता.जळगाव, माया शेळके खादगाव ता. जामनेर, विकास पाटील टाकळी ता. मुक्ताईनगर, सुभाष देसले चिंचपुरे ता. पाचोरा, सीमा पाटील हिवरखेडे खुर्द ता. पाचोरा, गजाला तबस्सुम सैय्यद असगर अली रावेर, संदीप पाटील डांभुर्णी ता. यावल यांचा समावेश आहे.
लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत तारिख निश्चित केली जाईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी दिली.












