चोपडा तालुक्यातील लसीकरणाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा लाईन लावण्यावरून अनेक अनेक गावांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे तसाच प्रकार वर्डी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात आयोजित केलेल्या शिबिरात घडला आहे. २५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या दरम्यान एका व्यक्तीने आरोग्य – कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वर्डी येथील शिबिरात एकाच दिवशी २५० नागरिकांचे लसीकरण असल्याने गर्दी झाली होती. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लसीचा एकत्र गर्दी असल्याने रांगेत उभे राहण्यावरून सुनील रघुनाथ पाटील (रा. वर्डी) यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी सुनील पाटील याच्या विरूद्ध अडावद पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जगदीश कोळंबे करत आहेत. शिबिरास डॉ. दिनेश वाघ, डॉ. राहूल पाटील, डॉ. महेंद्र पाटील, परिचारिका आशा धनगर, आशा शोभा पाटील, सुनीता पाटील, योगेश्वरी पाटील, शालिनी सोनवणे हजर होत्या.












