जळगाव ममुराबाद रस्त्यावर एस.टी.बसने दुचाकीला उडवले : ममुराबाद येथील दोघे जखमी

0
46

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद पासुन एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या रेणुका माता मंदिराजवळ दुचाकीला एस.टी.बसने समोरून धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाले. या अपघातानंतर बस चालक राजु ठाकरे यांनी बस जागेवर सोडुन धुम ठोकली.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि आज दुपारी साडेचार वाजेदरम्यान जळगाव कडून ममुराबाद कडे जाणार्‍या रस्त्यावर पांडुरंग सुरेश पाटील व प्रमोद बोरसे दोघ राहाणार ममुराबाद हे आपल्या मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 डी एन. 1294 ) ने घरी ममुराबादला येत असताना चोपड्याकडुन जळगाव कडे जाणारी एस.टी. बस (क्रमांक एम.एच.14 बी. टी. 2363) वरील चालक भरधाव वेगाने जात असतांना यांनी मोटर सायकलला समोरून धडक दिल्याने एसटीच्या उजव्या बाजुचा पत्रा पांडु पाटील यांच्या उजव्या हाताला ओढला गेल्याने हाताचा मांसाचा तुकडा तुटुन पडला होता. व प्रमोद बोरसे हे देखील गंभीर जखमी झाले आहे. अपघातामध्ये मोटरसायकलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर बस सोडून चालक जागेवरून पसार झाला. या अपघाता प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर कोळी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बस आणी मोटार सायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली व सदर अपघाता प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु.

Spread the love