जळगाव शहरातील धोकादायक उघड्या डिप्या लवकरात लवकर दुरुस्त करा – डॉ. आश्विन सोनवणे यांचे महावितरणला पत्र

0
46

जळगाव – शहरात दोन दिवसापुर्वी महापालीकेच्या इमारत समोरील रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलवरील धोकादायक रॉड मुळे मिलींद सोमनाथ पवार या व्यक्तीला जीव गमवावा लागला यापुर्वीही त्याठीकाणी काही वर्षापुर्वी असा एकाचा जीव गेला होता. त्यामुळे शहरातील धोकादायक डीपीचे दरवाजे तसेच विद्युत खांब दुरुस्त करावे असे भाजप नगरसेवक डॉ. आश्विन सोनवणे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की, दोन दिवसापुर्वी जळगांव महापालीकेजवळ इलेक्ट्रीक पोलवरील धोकादायक रॉड मुळे मिलींद सोमनाथ पवार या व्यक्तीला जीव गमवावा लागला यापुर्वीही त्याठीकाणी काही वर्षापुर्वी असा एकाचा जीव गेला होता तरीही तो रॉड आजपर्यंत काढण्यात आलेला नाही. दोन दिवसापुर्वी परत जीव जाऊन सुद्धा तो धोकादायक रॉड काढण्यात आलेला नाही. तरीही तो रॉड त्वरीत काढण्यात यावा किंवा वरती घेण्यात यावा तसेच शहरातील भरपुर ठिकाणी डी.पी.चे. दरवाजे उघडेच आहे त्यामुळे सुद्धा जीवीत हानी होऊ शकते ते डी.पी.चे दरवाजे बंद करण्यात यावे तसेच जिथे वायरींचे धोकादायक जाळे असतील ते सुद्धा व्यवस्थीत करण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल तरीही आपणास विनंती की त्वरीत उपाययोजना करण्यात यावी असे डॉ. सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे. निवेदनावर नगरसेवक धिरज सोनवणे, मिलिंद चौधरी, डॉ. राधेश्याम चौपरी, भूषण भोळे, चैतन्य कोल्हे मुविकोराज कोल्हे.

Spread the love