शिवसेना शिंदे गट घराघरांत पोचणार : गुलाबराव पाटील

0
46

जळगाव – शिवसेना शिंदे गट घराघरांत पोहोचविण्यात येईल. त्यासाठी महानोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. २२) येथे दिली.

पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी शहरातील शिवतीर्थ मैदानावर महासदस्य नोंदणी अभियानाला सुरवात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

शिंदे गटाची शिवसेना घरात आणि दारात जावी, यासाठी सर्वाधिक तरुणांना जोडण्याचे काम शिंदे गट शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात एक लाख शिवसैनिकांची नवीन नोंदणी करण्यात येणार आहे. या नोंदणीची सुरवात जळगाव शहरातून करण्यात आली.

 

शिवसेनेतून शिंदे गट निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाची स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यासोबतच स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत व्हावी, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीवर अधिक जोर दिला आहे.

आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांनी दिली.

उपजिल्हा प्रमुख स्वप्नील परदेशी, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महिला महानगराध्यक्ष ज्योती शिवदे, राहुल नेथलेकर, सोहम विसपुते, सागर हिरवाळे, गिरीश सपकाळे, हितेश ठाकरे, संदीप सुरडकर, पुष्पक सूर्यवंशी, भारतीताई रंधे, हर्शल मावळे, शंतनू नारखेडे, जितेंद्र पाटील, सावखेड्याचे सरपंच सुनील आगेवाल, केतन पोळ, सागर सैंदाणे, पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Spread the love