नवीन बी.जे मार्केटमध्ये दुकानाला आग लागल्याने खळबळ उडाली!

0
39

जळगाव – शहरातील नवीन बी.जे. मार्केट मध्ये आज एका दुकानाला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग तिसऱ्या मजल्यावरील प्रिंटींग प्रेसच्या दुकानाला दुपारी ४ वाजेच्या सुमारास लागली. आग विझवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमनदलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, विकास नारखेडे यांच्या मालकीचे अमोल इंटरप्रायझेस नावाचे प्रिंटींग प्रेस दुकान नवीन बी.जे. मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर आहे. दरम्यान आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. आग वाढत जाऊन तिने बघता बघता रौद्र रूप धारण केले. नवीन बी जे मार्केट मध्ये अनेक प्रिटींग प्रेस सह बॅनर आणि छपाई चे गाळे आहेत. त्यामुळे तेथील नागरीकांची मोठी धावपळ उडाली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीत दुकानातील छापाई मशीनरीसह कागद जळून नुकसान झाले आहे.

Spread the love