पाचोरा येथील 21 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल! गळफास घेऊन आत्महत्या …..

0
47

पाचोरा – तरुणांमध्ये आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात असल्याचे दिसून दिसतेय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. अशातच पाचोऱ्यातील २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

सौरभ रोहिदास पाटील (वय २१) असं मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील एका काॅलनीतील रहिवाशी माजी सैनिक रोहिदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा सौरभ पाटील याने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २५ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. घराच्या वरच्या खोलीत सौरभ याने टोकाचे पाऊल उचलले.

Spread the love