सात वर्षीय बालकाच्या अंगावर फटाका पडल्याने जखमी

0
46

जळगाव – घराच्या अंगणात उभ्या असलेल्या देवांश कमल प्रेमचंदाणी (वय ७ वर्षे, रा. सिंधी कॉलनी) या बालकाच्या अंगावर जळता फटाका पडल्याने त्याच्या मानेवर भाजले गेले.

या बालकावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवांश हा शनिवार, ११ नोव्हेंबर रोजी रात्री सिंधी कॉलनीमध्ये घराच्या अंगणात उभा होता. त्या वेळी आजूबाजूला फटाके फोडले जात होते. कोणीतरी जळता फटाका फेकला व तो या बालकाच्या शर्टवर पडला. शर्ट जळाल्याने बालकाच्या मानेवर भाजले गेले. त्यानंतर रविवार, १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांनी या बालकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

Spread the love