गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा रद्द ?

0
43

जळगाव – गृहमंत्री अमित शहा यांचा दि.15 रोजीचा युवा संवाद दौरा रद्द झाला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती सूत्रांची दिली आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरु होते.

मात्र त्यात बदल होत असून दि. १५ तारखेचा दौरा पुढे ढकलण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या दौऱ्यानिमित्त ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकांचे सत्र सुरु केले होते. सोमवारी त्यांनी सागरपार्क येथील सभास्थळाची पाहणी देखील केली होती.

Spread the love