ममुराबाद – ममुराबाद गावापासून विदगाव रस्त्यावर गावापासून तिन किलोमिटरच्या अंतरावर असलेल्या पुजा सुनिल भंगाळे यांच्या शेतातील कडब्याच्या गुळाला (गंजीला) अज्ञाताने आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ममुराबाद शिवारातील गावापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेले पुजा सुनिल भंगाळे राहाणार जळगाव यांचे शेत तुरखेडा येथील संदिप छगन कोळी हे जवळपास दोन वर्षापासून उक्त्याने करतात यावर्षी देखील त्यांनी या शेतात दादर पेरली होती. दादर काढणीनंतर दोन दिवसापुर्विच चाऱ्याचे दोन गुळ शेतात लावले होते. आज सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने शेतातील जमा केलेल्या चाऱ्याच्या ढिगाला (गुळाला) आग लावली व तो तेथुन पसार झाला.
शेतात चाऱ्याच्या ढिगाला आग लागल्याचे पाहुन काहि लोकांनी आग विझवण्याचा प्रयन्त केला परंतु चाऱ्याच्या ढिगाऱ्यातुन आगीचे मोठमोठे बंब निघत असल्यामुळे आग विझवता आली नाही व सर्व कडबा (चारा) जळुन खाक झाला.
यात शेतकरी संदिप छगन कोळी राहाणार तुरखेडा यांचे जवळपास पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.
तक्रार दाखल करणार
उद्या सकाळी ममुराबाद पिक संरक्षण सोसायटी येथे तक्रार करूण जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे देखील शेतमालक संदिप छगन कोळी यांनी सांगितले.












