जळगाव जि.प. सीईओ अंकित यांची बदली रद्द

0
39

जळगाव – 20 मार्च (हिं.स.) जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत.

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन जळगाव जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्याचे आदेश काढण्यात येऊन त्यांच्या जागी जळगाव येथे धुळे येथील सीईओ असलेले शुभम गुप्ता रूजू होणार होते. मात्र शासनाकडून त्यांची बुलढाणा येथे झालेली बदली रद्द करण्यात येऊन त्यांना पुन्हा जळगाव जिल्हा परिषदेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती श्री. अंकित यांनी बोलतांना दिली.

 

Spread the love