निंभोरा येथे भारतीय बौद्ध महासभेचे दहा दिवशीय महिला प्रशिक्षण शिबीराचे उदघाट्न

0
47

निंभोरा – रावेर तालुक्यातील निंभोरा रेल्वे स्टेशन येथे दि.01/04/24 सोमवारी दुपारी 3:00 वाजता भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्वच्या अंतर्गत रावेर तालुक्याच्या वतीने दहा महिला प्रशिक्षण शिबीराचे उदघाट्न रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

त्यावेळी भारतीय बोद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा संघटक आरती तायडे, आशा पो्हेकर, विद्या वाघ, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, तालुका सरचिटणीस संघरत्न दामोदर, उपाध्यक्ष संस्कार गौतम अटकळे, तालुका कोषाध्यक्ष प्राध्यपाक रमेश वाघ, संघटक पी. के. महाले इत्यादी ची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी यांनी उपस्थित प्रशिक्षण महिलांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद तायडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन बोद्धचार्य पी. के. महाले यांनी केले.

Spread the love