विष्णू भंगाळे शिंदेच्या शिवसेनेत I उबाठा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

0
29

Jalgaon sandesh news network 

पदाचा राजीनामा कि पक्षातून हकालपट्टी

Jalgaon – : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असताना जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकीने राजीनामा दिला आहे. भंगाळे हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

 

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आ.सुरेश भोळे हे तिसऱ्यांदा उमेदवारी लढवत आहेत तर शिवसेना uddav Thakre गटाकडून माजी महापौर जयश्री सुनील महाजन या निवडणूक लढवत आहेत. जळगाव जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे राजीनामा देत असून त्यांनी देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Vishnu Bangali हे शिवसेनेत प्रवेश करणार असून शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. मतदानाच्या तोंडावर विष्णू भंगाळे यांच्या पक्ष बदलमुळे जळगावात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Spread the love