जळगाव -: खानदेशातली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी निवडणूक म्हणजे जळगाव शहर महानगरपालिकेवर कोणाची सत्तायेणार? याचे चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. अशात सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय्य सहाय्यक कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अरविंद देशमुख हे प्रभाग क्रमांक 15 मधून विजयी ठरले आहेत . सामाजिक कार्यामुळे देशमुख यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून पक्ष श्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने त्यांनी आभार मानले आहेत .
जळगाव 75 पैकी 63 जागांसाठी गुरुवारी शहरात 53.59 टक्के मतदान झाले. यानंतर आज 16 जानेवारीला सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. जळगाव महापालिकेत निवडणुकी आधी 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या सहा जागांचा समावेश आहे. निकालामध्ये भाजप आणि शिवसेनेने आधीच आघाडी घेतलीआहे. सध्या निकालाचे आकडे हाती येत असून हळूहळू या निवडणूकीचे चित्र स्पष्ट होत आहे. यात बहुतांश प्रभागांमध्ये महायुतीचा बोलबाला असल्याचं चित्र दिसत आहे.
जळगाव जिल्हादुधसंघाचे संचालक तथा भाजपचे पदाधिकारी अरविंद देशमुख हे मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय्यसहाय्यक देखील आहेत, आपल्याने त्याने दिलेले प्रत्येक ‘टास्क’ पूर्ण करणे ही त्यांची खासियत मानली जाते. विधानसभा निवडणुक दरम्यान अरविंद देशमुखांचे रावेर विधानसभा मतदारसंघासाठी चे प्रयत्न हे सर्वश्रूत आहेत जिल्हाकृषी औद्योगिक सहकारी संस्थेत ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, तसेच मदतीला धावून जाणारा सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची खास ओळख आहे.
महायुतीमध्ये भाजपचा 21 शिवसेना शिंदेगट 12 जागेवर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकाजागेवर विजय..
प्रभाग क्रमांक 19 क मधून शिवसेना शिंदेगटाचे निकिता देशमुख विजयी
प्रभागक्रमांक 12 मधून भारतीय जनता पक्षाचे भाजपाचे अनिल अडकमोल विजयी
प्रभागक्रमांक 11 मधील शिवसेनेचे उमेदवार ललित विजय कोल्हे (1102), सिंधूताई विजय कोल्हे (1200), डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे आणि संतोष मोतीराम पाटील (950) सर्व उमेदवार आघाडीवर
प्रभाग क्रमांक 18 मधील शिवसेना शिंदेगटाचे दोन उमेदवार विजयी
प्रभाग 19 मध्ये महायुतीमधील भाजपचे राजेंद्र घुगे विजयी











