प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – संत मुक्ताई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत “Study on Utilization of Market Intelligence by Host Farmer” या विषयावर यजमान शेतकऱ्यांशी संवाद साधून अभ्यास करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान शेतकऱ्यांना विविध पिकांच्या सध्याच्या बाजारभावांची माहिती देण्यात आली. तसेच बाजारातील मागणी, किंमतीतील चढ-उतार यांचा विचार करून कोणत्या पिकांची लागवड करणे फायदेशीर ठरू शकते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या अनुभवांचे व मतांचे लिखाण करून त्यांची माहिती नोंदविण्यात आली.
या कार्यक्रमास गावातील शेतकरी व युवक उपस्थित होते.
मार्गदर्शन व समन्वय : हा संपूर्ण उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. सागर बंड व डॉ. प्रीती दातीर आणि विषय शिक्षक डॉ. ऐश्वर्या पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सहभागी कृषीकन्या : या उपक्रमात महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थिनी – समृद्धी पालवे, मानसी देसाई, प्रिती शिंदे, स्नेहल माने व सुचिता पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष अनुभव मिळत असून शेतकरी व विद्यार्थिनी यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होत आहे. तसेच बाजारपेठीय माहितीचा योग्य वापर करून पीक नियोजनास चालना मिळण्यास मदत होत आहे.












