‘अजय माळी प्रेझेंट्स’चे ‘दर्द ना समझना’ : अहिराणी गीतातून प्रेम, विरह आणि थराराचा अनोखा अनुभव

0
3

अवघ्या ३ ते ४ मिनिटांत बॉलीवूड चित्रपटाची अनुभूती; खानदेशातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न

संपादक – महेंद्र सोनवणे                                खानदेश : अहिराणी भाषेला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘Ajay Mali Present’ या माध्यमातून ‘दर्द ना समझना’ हे नवे अहिराणी गीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम, विरह, गैरसमज, नाती आणि संघर्ष यांची भावनिक गुंफण असलेल्या या गाण्यात खानदेशी संस्कृतीसोबतच बॉलीवूड शैलीतील सादरीकरणाचा प्रयोग करण्यात आला आहे.

या गीताची निर्मिती, दिग्दर्शन, गायन आणि कथा अजय माळी यांनी केली आहे. संगीत व रेकॉर्डिंग समीर शेख, तर DOP म्हणून सागर कोळी आणि निखिल वडकेर यांनी काम पाहिले आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून नितीन पंडित यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

अजय माळी आणि पायल पवार मुख्य भूमिकेत

या गीतामध्ये अजय माळी आणि पायल पवार हे मुख्य कलाकार आहेत. दोन्ही कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये जीव ओतून अभिनय केला असून, प्रेम आणि विरहाची भावनिक बाजू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रेमकथेपासून थरारक वळणापर्यंत…

‘दर्द ना समझना’ या गाण्यामागची कथा एका तरुणाच्या मनापासून केलेल्या प्रेमाची आहे. एका मुलीवर मनापासून प्रेम करणारा तरुण त्या नात्यात आपले संपूर्ण आयुष्य पाहतो. मात्र गैरसमज, परिस्थिती आणि कुटुंबीयांचा दबाव यामुळे दोघे वेगळे होतात.

मुलगी आयुष्यात पुढे निघून जाते; मात्र तरुण जुन्या आठवणींमध्ये अडकून राहतो. त्याच्या मनातील वेदना आणि अस्वस्थता पुढे एका धक्कादायक आणि अनपेक्षित वळणावर पोहोचते. त्यानंतर कथेत घडणाऱ्या घटनांमधून प्रेक्षकांना प्रेम, वेदना, भावनिक संघर्ष आणि थराराचा वेगळा अनुभव पाहायला मिळतो.

निर्मात्यांनी या कथेत प्रत्येक फ्रेम आणि दृश्य विचारपूर्वक साकारण्याचा प्रयत्न केला असून, खानदेशी गाण्याच्या माध्यमातून बॉलीवूड शैलीचा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अवघ्या काही मिनिटांत तीन तासांच्या चित्रपटाची अनुभूती

साधारण तीन ते चार मिनिटांच्या या गाण्यामध्ये प्रेम, विरह, भावना, संघर्ष आणि थरार अशा विविध भावनांचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हे केवळ एक गाणे न राहता एखाद्या चित्रपटाची छोटीशी कथा पाहिल्याचा अनुभव देईल, असा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.

अहिराणी भाषा आणि खानदेशी संस्कृती जपण्याचा संकल्प

अहिराणी भाषेला महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. खानदेशची भाषा, संस्कृती, गावाकडची बोली, प्रेम, नाती, सण-परंपरा, संघर्ष आणि जीवनशैली गाण्यांच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न Ajay Mali Productionच्या माध्यमातून केला जात आहे.

‘फक्त गाणे चांगले आहे’ एवढ्यावर न थांबता ‘हे Ajay Mali Styleचे अहिराणी गाणे आहे’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, अशी संकल्पना या टीमची आहे.

खानदेशातील नव्या कलाकारांना संधी

गायक, गीतकार, अभिनेता, अभिनेत्री, नर्तक, संगीतकार, DOP यांसह खानदेशातील विविध क्षेत्रातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जात आहे.

या गीताच्या Creative Teamमध्ये विकास वडिले, नितीन पंडित, अभिजित सोनार, साहिल सिसोद, संदीप कोळी, राहुल राजपूत, रघुनाथ पाटील, गणेश माळी तसेच संपूर्ण Ajay Mali Production Teamचे योगदान आहे.

सोशल मीडियाच्या पलीकडे प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

YouTube, Instagram आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर गाणे प्रसिद्ध करण्याबरोबरच ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचावे, त्यातून काहीतरी भावना किंवा विषय प्रेक्षकांच्या मनात निर्माण व्हावा, हा या निर्मितीमागचा उद्देश आहे.

प्रेम, विरह आणि मैत्री यांसारख्या विषयांची वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करण्यावर Ajay Mali Productionचा भर आहे.

खानदेशी भाषेला आणि स्थानिक कलाकारांना मोठ्या व्यासपीठावर नेण्याच्या या प्रयत्नात ‘दर्द ना समझना’ हे गाणे प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरण्याची अपेक्षा आहे.

अजय माळी यांच्या अभिनयाची आणि या अनोख्या प्रयोगाची झलक पाहण्यासाठी ‘Ajay Mali Production’ या YouTube चॅनेलला एकदा नक्की भेट द्या.                                                                ‘दर्द ना समझना’ — लवकरच आपल्या भेटीला!

Spread the love