मध्यप्रदेशातील अस्वलाच्या हल्यात डोळे गमावलेल्या आदिवासी बांधवाला मदतीची गरज !

0
2

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर तालुक्यातील जामठी गावातील एका आदिवासी युवकावर अस्वलाने मोठा हल्ला केला होता या हल्ल्यात आदिवासी तरुणाचे डोळे गेले असून आज पर्यंत जी मदत पाहिजे ती मिळालेली नाही त्यामुळे संबंधित आदिवासी कुटुंबांना शासनाच्या वतीने मदत मिळणे गरजेचे आहे मात्र संबंधित कुटुंब अतिशय गरीब असल्याने कोणताही पदाधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने आज रोजी जिवन भिलाला यांचं कुटुंब शासकीय योजनांपासून वंचित राहिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की , सप्टेंबर २००६ मध्ये गोरक्षनाथ परिसरात बऱ्हाणपुर गावा पासून १५ किलोमीटर असलेल्या आणि मोहद गावापासून १० किमी अंतरावर असलेल्या जामठी या गावाचे रहिवासी जिवन खुमानसिंग भिलाला हे बैल चारण्यासाठी सप्टेंबर २००६ या वर्षी जंगलात गेले होते.यावेळी अस्वलाच्या हल्यात जिवन भिलाला हे गंभीर जखमी झाले.विशेष म्हणजे अस्वलाने जिवन भिलाला यांचे डोळे काढून चेहरा व अंगावर जखमा केल्या.त्यावेळी मालवीर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पदाधिकार्यांनी त्यांना दवाखान्यात नेले परंतु या कामासाठी बराच वेळ खर्च झाला आणि शेवटी इंदूर येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र दोन्ही डोळे गेले असल्याने आज रोजी जिवन भिलाला हे पुर्ण अंध व्यवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाकडून मदत पाहिजे म्हणून त्यांचे कुटुंब वाट पाहत आहे मात्र गेल्या २० वर्षांपासून आज पर्यंत कोणतीही व्यक्ती त्यांच्या पर्यंत पोहचली नसून बऱ्हाणपूर आमदार आदरणीय अर्चना चिटणीस यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून जामठी ता बऱ्हाणपूर जि बऱ्हाणपूर येथील गरीब आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे.

Spread the love