प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील आई प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती श्रद्धा, आदर आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता, समता आणि सामाजिक ऐक्याचा दिलेला संदेश आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. गांधीजींच्या विचारांचा केवळ जयघोष न करता ते आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. अरविंद बावस्कर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर भाऊ बडगुजर, माजी सरपंच श्री. रामलाल बडगुजर, प्रमोद उंबरकर, विकास चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सामाजिक सलोखा, स्वच्छता, मानवता आणि समाजहिताच्या कार्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“गांधीजींच्या विचारांची ज्योत हातात घेऊन, समाजसेवेचा मार्ग अधिक प्रकाशमान करूया; सत्य, अहिंसा आणि माणुसकीची वाटचाल पुढे नेऊया,” असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
आई प्रतिष्ठान
समाजहितासाठी सदैव कार्यरत










