वराडसिम येथील बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी सुटले !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील ग्रामस्थांनी विकास कामे होत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालया समोर दि.१९ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयाने विविध प्रकारच्या कामांना सुरुवात केली होती. दि.२३ रोजी पाचव्या दिवशी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ कुलदीप ठाकरे , विस्तार अधिकारी गौतम वाढे , ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, एस डी पाटील यांनी या उपोषण स्थळी भेट देऊन सर्व मागण्या येत्या तीन महिन्यांत पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते अक्षय संतोष सपकाळे व सहकाऱ्यांनी उपोषण सोडले यावेळी सरपंच सौ निलप्रभा पाचपांडे , ग्रामविकास अधिकारी राहुल तायडे व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love