भारतीय जनता पक्षाकडून टॉवर चौकात नबाब मलिक यांच्या पुतळ्यांचे दहन !!!

0
8

वीरेंद्र मंडोरा

https://youtu.be/ZQe7G_ON_XU

जळगाव -आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन टॉवर चौकात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले . गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकारणात त्या वेगवेगळ्या खेळीमुळे नबाब मलिक हे विरोधकांच्या तावडीत सापडले आहे व त्यांच्या विविध प्रकरणात हस्तक्षेपामुळे व विधानांमुळे त्यांच्याविरुद्ध विरोधक आक्रमक झाले आहे व भारतीय जनता पक्षाने त्यांच्या देश विघातक व देशद्रोही लोकांशी असलेल्या संबंधा च्या लागलेल्या आरोपामुळे आज टॉवर चौकात निषेध नोंदवून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे नगरसेवक दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी , डॉक्टर विरल खडके, डॉक्टर महाजन, राजेंद्र मराठे व इतर अनेक कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Spread the love