विजेच्या टॉवरवर चढून तुफान राडा बायको खोखो रुसल याने जावायाचे सासरवाडीत शोले स्टाईल मध्ये आंदोलन

0
24

जालना – : संसार म्हटलं तर नवरा बायकोचे वाद हे होतचं असतात. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे या दोघांच्यात वादाची आग पेटत असते. मात्र काही काळानंतर या दोघांमधील वाद मिटतो. मात्र सध्या असं एक प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून तुमचीही झोप उडेल.

बायकोशी भांडण झाल्यामुळं संतापलेला एक तरुण थेट सासुरवाडी येऊन तिथं ‘शोले स्टाइल’ स्टंट करत थेट उच्च दाबाच्या वीज टॉवरवर चढला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सासरच्या मंडळी चांगलाच धक्का बसून गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा संपूर्ण प्रकार जालना जिल्हयातील सोनखेडा-भराडखेडा शिवारात घडला आहे.

मंगेश शेळके असं या तरुणाचं नाव आहे. मंगेशचा पत्नी सोबत वाद झाला व मंगेश सासुरवाडत येऊन टॉवरवर चढला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या घडलेल्या प्रकारावेळी मंगेश याने मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संद्याकाळी मंगेश शेळके हा आपल्या सासुरवाडीतील विजेच्या टॉवरवर चढला.

त्याला टॉवर वरून खाली उतरवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण तो खाली उतरण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, परंतु पठ्ठ्या ऐकायला तयार नव्हता. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावातील जबाबदार मंडळींनी त्याची समजूत घातली व त्याला खाली उतरवले. मंगेशच्या या पराक्रमामुळे संपूर्ण आजूबाजूच्या गावात खळबळ उडाली आहे

खरंतर जावई म्हटलं तर सासरकडच्या लोकांना त्याला खुश करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. जावई म्हटलं तर त्याचा मानपान, खाणंपिणं, त्याच्या अनेक इच्छा या सासरकडच्या मंडळीना पूर्ण कराव्या लागतात. मात्र मंगेशच्या या पराक्रमामुंळे सासरकडच्या सर्वच मंडळींनी डोक्याला हात लावला आहे.

Spread the love