बांधावरील झाड तोडल्याने दोन गटात हाणामारी

0
45

चाळीसगाव -तालुक्यातील मुंदखेडे बु. येथे शेतातील बांधावरील झाड तोडल्याच्या कारणावरुन एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

सुधीर शिवाजी पाटील रा.मुंदखेडे याचा मुलगा महेश शेतात गुरांसाठी ऊसाचे टिपरे वेचत असताना, अचानक बांधवरील झाड तोडल्याच्या कारणावरुन जगदीश उर्फ नाना संजय पाटील, बंटी संजय पाटील, ऋषीकेश गोकुल पाटील, एकनाथ बालचंद्र पाटील, मुकेश आत्माराम पाटील आदिनी वाद घालून महेश या शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तसेच एकाने लोखंडी रॉड मारुन त्याला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सुधीर पाटील यांच्या फिर्यादीवरुन जगदीश उर्फ नाना संजय पाटील, बंटी संजय पाटील, ऋषीकेश गोकुल पाटील, एकनाथ बालचंद्र पाटील, मुकेश आत्माराम पाटील यांच्या विरोधात भादवी कलम ३०७, ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत जगदीश संजय पाटील हे मुंदखेडा शिवारातील त्यांच्या शेता गेले असाता, महेश पाटील हा बांधावरील झाड तोडून, लाकूड ट्रॅक्टरमध्ये ठेवत असतांना हटकले असता. सुधीर शिवाजी पाटील, महेश पाटील, यांनी जगदीश पाटील यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच त्याला दांड्याने देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरुन सधीर शिवाजी पाटील, महेश सुधीर पाटील यांच्या विरोधात भादवी कलम ३०७,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Spread the love