यावल – येथील शहरालगतच्या श्री व्यास मंदीर जवळील स्मशानभुमीच्या मागील बाजुस एका ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना बेकायद्याशीर वाळुची वाहतुक करणारे वाहन महसुल प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत जप्त करण्यात आल्याची माहीती समोर आली असुन, सदरचे ट्रॅक्टर वाहन हे यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले असुन , पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे . या संदर्भात महसुल प्रशासनाच्या वतीने मिळालेली माहीती अशी की , आज दिनांक २९जानेवारी २०२२रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास यावल येथील शहरातगतच्या श्री व्यास मंदीर परिसरातील हिन्दु स्मशानभुमीच्या मागील बाजुस मार्गावरून स्वराज्य कंपनीचे निळया रंगाचे ७४४ एफई मॉडेलच्या विना क्रमांकाचे धुळ असलेल्या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आले ,महसुलच्या पथकाने सदरचे ट्रॅक्टर वाहन थांबवुन वाहनाची तपासणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळु आढळुन आली असुन या बाबत सदरच्या ट्रॅक्टरवरील चालक संजय भगवान भोई वय वर्ष राहणार बोरावल गेट जवळ यावल याच्याकडे विचारणा केली असता वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याची माहीती मिळुन आली या वेळी महसुल पथकातील फैजपुर विभागाचे मंडळ अधिकारी एम . एच . तडवी ,परसाडे तलाठी समिर तडवी ,यावल शहर तलाठी ईश्वर कोळी, डोंगर कठोरा तलाठी , अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी व टाकरखेडा तलाठी उमेश बाभुळ्कर , डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी यांच्या पथकाने केलेल्या कारवाई अवैध वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर तिन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व२५ हजार रूपये किमतीचे धुळ व १ हजार ५०० रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळु असे ३ लाख२६ ह्जार रुपये किमतीचे वाहनासह धुळ जप्त केले असुन, सदरचे वाहन हे यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असुन , यावल पोलीस स्टेशनला या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












