उमरी:जळगाव जिल्ह्यातील सांगवी ( खुर्द) येथील आदिवासी कोळी समाजाच्या मुलीवर बलात्कार करण्याऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी याकरिता कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्ह्य़ाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना निवेदन देण्यात आले.
सदरील,कोळी राष्ट्रसंघ चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री गोकुळ दादा कोळी यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री बळीराजे वाघमारे यांच्या आदेशानुसार मराठवाडा उपाध्यक्ष मा.श्री. उद्धवभाऊ मामडे रावधानोरकर यांच्या अध्यक्षतेखालील
कोळी राष्ट्रसंघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सांगवी ( खुर्द) येथील आदिवासी कोळी समाजाच्या मुलीवर बलात्कार करण्याऱ्या आरोपीला फाशी देण्यात यावी,जाहीर निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी,नांदेड महिला जिल्हा अध्यक्षा सौ.सरिकाताई चुणूपवाड,नांदेड जिल्हा अध्यक्ष मा.श्री लक्ष्मणभाऊ जंगेवाड श्री मारोतराव पटाईत
नगराध्यक्ष (बिलोली)
श्री योगेश सोनाळे(भीम आर्मी शहर अध्यक्ष नांदेड)श्री स्वप्नीलभाऊ संघरत्न जोंधळे (भीम आर्मी जिल्हा संघटक नांदेड)श्री.अशोक काका कांबळे,श्री.दुर्गेश साळवे सामाजिक कार्यकर्ते श्री.रोहित जमदाडे सामाजिक कार्यकर्ते श्री.दीपक पिलेवाड यांच्यासह नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्य़ातील कोळी राष्ट्रसंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.











