ममुराबाद येथे शिवजयंती निमीत्ताने रक्तदान शिबीर संपन्न,,,,

0
57

ममुराबाद (प्रतिनिधी) ; शिवजयंती निमित्ताने ममुराबाद येथे दिनांक 18/02/2022 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये ममुराबाद मधील ग्रामस्थांनी रक्तदान केले या शिबिराचे आयोजन शिवजयंती समिती ममुराबाद च्या वतीने आयोजित केले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन समितीच्या पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करूण रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव चे जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड, जागृती लोहार तंत्रज्ञ,जयवंत पाटील मदतनीस यांनी काम पाहिले.ममुराबाद येथे रक्तदान शिबिराची सुरुवात झाल्यावर लहानांनपासून थोरांनी यात सहभाग घेऊन रक्तदानासाठी योगदान दिले.

नागरिकांनी मोठ्या उत्साही वातावरणात रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करण्याच योगदान दिले याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत शिवजयंती समितीचे पदधिकारी यांनी केले.

यावेळी निखील पाटील, किरण पाटील, बाबु वसाने, राजु पाटील, बापु पाटील, आदि उपस्थीत होते.

Spread the love