जि प प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल ममुराबाद येथे शिवजयंती साजरी.

0
48

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

ममुराबाद – येथील जि प  प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल येथे आज सकाळी ९ = ०० वाजता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी सर्व शिक्षक वृंद,अंगणवाडीच्या सेविका मदतनीस तसेच ग्रामस्थ, व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शिक्षीका श्रीमती कल्पना चौधरी यांनी विद्यार्थ्यांना छत्रपतीच्या जीवन चारित्र्याबद्दल माहिती दिली. 

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दीनदुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी केव्हाही जातीयवाद केला नाही. छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे,’ असे मत श्रीमती चौधरी यांनी व्यक्त केले.

 

Spread the love