जळगाव– तालुक्यातील धामणगाव येथील रहिवासी तरुण अक्षय राजू सपकाळे (वय २०), रा.धामणगाव मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पोहतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
अक्षय राजू सपकाळे (वय २०, रा.धामणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे आई वडील शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.
तो तुरखेड शिवाराजवळ तापी नदी पात्रामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला. सोबतच्या मित्रांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अक्षय सपकाळे याचे आई, वडील शेती करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.












