मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा; पुतीन म्हणाले “युद्ध टाळलं जाऊ शकत नाही”

0
48

रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली असून युद्धाचे ढग अजूनच गडद झाले आहेत. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतीन म्हणाले आहेत.

पुतीन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगण्यात आलं. या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं आहे.

पुतिन यांची इतर देशांना धमकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा करताना धमकीही दिली आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, “यामध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागली. इतिहासात कधीच भोगावे लागले नाहीत अशा परिणामांना सामोरं जावं लागले. सर्व महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तुम्ही मला ऐकलं असेल अशी आशा आहे”.

Spread the love