ममुराबाद येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामसचिवालयाचे भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न !! !!

0
46

जळगाव संदेश

ममुराबाद – येथे आज दिनांक 27 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी पालक मंत्र्यांचा ताफा गावात पोहचल्यावर ग्रामपंचायत सदस्या अंजनाबाई शिंदे यांचे हातून औक्षण करण्यात आले. त्यानंतर दत्त चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.

तेथुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन प्रसंगी मा.गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते कुदळी मारून भुमिपुजन करण्यात आले. त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 5 मध्ये मंजुर असलेल्या पेव्हर ब्लॉकचे व वाल कंपाऊंडच्या कामांचे भुमीपुजन करण्यात आले.

यावेळी जि प सदस्य पवन सोनवणे, पं स सभापती जनार्दन पाटील, सरपंच हेमंत चौधरी, सदस्य गोपाळकृष्ण मोरे, अमर पाटील, संतोष कोळी, सौ साधना चौधरी, सौ सुनिता चौधरी,सौ प्रितम पाटील, शैलेंद्र पाटील, अनिस पटेल, ऐजाज पटेल,विलास सोनवणे, ग्रामस्थ महेश चौधरी, प्रकाश पाटील, नासिर शेख, सुनिल चौधरी, गोरख कोळी, भरत शिंदे, रावसाहेब पाटील, विजय सोनवणे,दत्तु सोनवणे, रामनारायण तिवारी, हरीष चौधरी, बाळा भाऊ कोळी विदगाव,दिलीप जगताप रिधुर, वासुदेव सोनवणे नांद्रा, आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

Spread the love