एकाच दिवसी दोन मोटारी चोरी : यावल स्थानकात गुन्हा दाखल

0
49

यावल प्रतिनीधी  –  येथील कालव्या लगत असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या शेत विहिरीतुन थेट विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी लांबवले हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला असुन सुमारे ८० हजारा रूपये किंमतीचे हे विद्युत पंप होते या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सतीष सुपडू यावलकर यांचे जुना भालशिव रोडवर शेत गट क्र. १४७० आहे व लगतचं गोपाळ कोळी यांचे शेतगट क्रमांक १४८२आहे या दोघ शेतकऱ्यांच्या शेत विहिरीवर पाण्याचा उपसा करण्यासाठी यावल कर यांच्या विहिरीत दहा तर कोळी यांच्या विहिरीत साडेसात अश्वशक्तीचे पंप किंमत सुमारे ८० हजार हे बसविण्यात आले होते. मंगळवारी शेतकरी शेतात गेले असता दोघ विहिरीतील विद्युत पंप अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात सतीष यावलकर यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरूध्द विद्युत पंप सह केबल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे. तर अशा प्रकारे थेट शेत विहिरीतुन विद्युत पंप चोरीस गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस ठाणे हद्दीत शेतात विहिरीवरील केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असतांना एकाच रात्रीत दोन ठिकाणी वीजपंप चोरीस गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love