नामदेव खंडू अँड कंपनी यांच्या मालकीच्या असलेल्या दोन मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची अज्ञात इसमाकडून तोडफोड.

0
44

रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले– रावेर तालुक्यातील निंभोरा येथील नामदेव खंडू अँड कंपनी यांच्या मालकीच्या असलेल्या दोन माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या काचा फोडून अज्ञात इसमाने नुकसान केल्याची घटना काल रात्री घडली.

सविस्तर वृत्त असे की,दि.०२रोजी रात्री बस स्टँड शेजारी असलेल्या प्रसिद्ध किराणा व्यापारी नरेंद्रशेठ ढाके यांच्या टाटा ४०७ व पिकअप अशा दोन मालवाहतूक करणाऱ्या गाड्या त्यांच्याच मालकीच्या प्लॉटमध्ये लावलेल्या होत्या.त्या गाड्यांच्या काचांवर अज्ञात इसमाने विटा दगड ड्रायव्हर बाजूने मारून काचा फोडून नुकसान केले.विशेष म्हणजे नरेंद्र ढाके यांच्याच प्लॉट मध्ये इतर ग्रामस्थांची वाहने ही असतांना त्यांना कुठलेही नुकसान न करता नरेंद्र ढाके यांच्याच वाहनांचे नुकसान करण्यात आले.सदर घटनेची माहिती कळताच सकाळी निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ,पोहेकॉ विकास कोल्हे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डिगंबर चौधरी,सुनील कोंडे,भास्कर महाले,रोहिदास ढाके,कुंदन ढाके,कुंदन धांडे,राजीव बोरसे आदिंनी घटनास्थळी पाहणी केली.याबाबत निंभोरा पोलिसांत नरेंद्र नामदेव ढाके यांच्या तक्रारीची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ कोल्हे करीत आहेत.दरम्यान याच भागात या आधी सुद्धा सुभाष मोरे यांच्या वाहनांचे ही काचा फोडून नुकसान करण्यात आले होते.याठिकाणी मोकळ्या परिसरात मदयपींचा वावर असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही या भागातील रहिवाशांनी केली आहे.

Spread the love