खुणाच्या गुन्हयातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

0
41

जळगांव – येथील जिल्हापेठ पो.स्टे. हद्दीत दि.१८/०३/२०२२ रोजी गुन्ह्यातील आरोपीतांनी पुर्वीच्या भांडणावरुन फिर्यादी अरुण भिमराव गोसावी व साक्षीदार सुरज विजय ओतारी यांना शिवीगाळ करुन गंभीर जखमी केले म्हणुन जिल्हा पेठ पो.स्टेला गुरन २२४/२०२२ भादंवि कलम ३०७, १४३, १४७, वगैरे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु यातील साक्षीदार सुरज विजय ओतारी याचा उपचारादम्यान मृत्यु झाल्याने सदर गुन्हयात वाढिव कलम ३०२ हे कलम लावण्यात आले होते.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक श्री. डॉ. प्रविण मुंढे सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो श्री. चंद्रकांत गवळी, मा.पोलीस उपअधिक्षक सो श्री कुमार चिंथा जळगाव भाग जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सो यांना सदर गुन्हयातील फरार आरोपीचा लवकरात लवकर शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले सो यांनी सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता स्था.गु. शाखा कडील सफौ/ अशोक महाजन, पोहेकॉ/विजयसिंग पाटील, पाटील, अक्रम शेख, जितेंद्र सुधाकर अंभोरे, पोना/ अविनाश देवरे, प्रितम पाटील, राहुल पाटील अशांचे पथक तयार करुन सदर आरोपीचा शोध घेणेकरीता जळगांव शहरात रवाना केले सदर पथकाने गुप्त बातमीदाराकडुन माहिती काढुन सदर गुन्हयातील आरोपी नामे अक्षय उर्फ गंप्या राठोड हा पिंप्राळा भागात फिरत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने जळगांव पिंप्राळा भागात सापळा लावुन सदर आरोपीतास अतिशय शितीफिने २३.०० वा.सु. भवानी मंदिर पिंप्राळा येथे पकडले त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव अक्षय उर्फ गंम्प्या नारायण राठोड वय-२० रा. शंकर आप्पा नगर जळगांव असे सांगितले व सदर आरोपीतांने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी जिल्हापेठ पो.स्टेला हजर केले आहे.

Spread the love