जळगाव संदेश
ममुराबाद/ असोदा (प्रतिनिधी) :- आगामी काळातील सण उत्सव कायद्याचे पालन करून शांततेत साजरे करा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्या, असे आवाहन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. शुक्रवारी संध्याकाळी ममुराबाद ग्रामपंचायत कार्यालयात तसेच असोदा येथे मराठी शाळेच्या आवारा मध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा जोतिबा फुले जयंती, श्रीराम नवमी निमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार, यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी या बैठकीला पोलीस कर्मचारी साहेबराव पाटील, मानिक सपकाळे, विलास शिंदे, विश्वनाथ गायकवाड, मनोज पाटील, ममुराबाद सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच नासिर शेख, सदस्य अमर पाटील, विलास सोनवणे, अनिस पटेल, ग्रामस्थ भागवत सोनवणे,धनराज पाटील,लोटण पाटील, विजय सोनवणे, अतुल पाटील, पंकज गुरव, असोदा येथील बैठकिमध्ये सरपंच दिलीप पाटील, तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व असोदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.












