जळगाव (प्रतिनिधी)आदर्श राज्यघटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पिंप्राळा परिसरातील सोनी नगरमध्ये विविध कार्यक्रम जल्लोषात यशस्वीपणे पार पडले.
सकाळी 9.30 धम्म रॅलीने प्रारंभ करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला व युवक वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर 10.30 वाजता गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण स्वयंभू महादेव बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष नरेश बागडे व कैलास कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच हुडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते जाकीर पठाण, विजय निकम, विनोद निकम यांच्या हस्ते पुष्प वाहण्यात आली.
त्यानंतर परिसरातील निकिता सोनवणे, नेहा सोनवणे, प्रियांका सोनवणे, प्रणाली भालेराव, स्नेहा सपकाळे यांनी परित्राण पठण केले.
त्यानंतर दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान अन्नदानाचा कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिसरातील नगरसेवक सुरेश सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, नरेश बागडे, सरदार राजपूत ,नगरसेवक शफी शेख शरीफ, विनोद निकम, प्रकाश जाधव, विनोद लोखंडे, उमेश निंबाळकर,
सागर बांगर, मुयर भालेराव, सागर सुरडकर, आकाश सोनवणे,चंद्रकांत ननवरे, प्रितेश मसाने,प्रेम भालेराव, संदीप सोनवणे,मयुर सोनवणे, भीमराव सोनवणे, किरण हिवाळे, कडू हिवाळे, राजू कांबळे, आदी परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.












